🌿 **किडनी फेल्युअरची कारणे – भाग १
(Painkiller मुळे होणारे किडनीचे नुकसान)**
किडनी फेल्युअर ही आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारी समस्या आहे. चुकीची जीवनशैली, अनियंत्रित औषधोपचार आणि स्वतःहून घेतलेली Painkiller औषधे हे किडनी खराब होण्यामधील मोठे कारण ठरत आहेत. अनेकांना हे माहितही नसते की साधी डोकेदुखी, सांधेदुखी किंवा थकवा आला म्हणून घेतलेली Painkiller हळूहळू किडनीवर गंभीर परिणाम करू शकते.
Healvibe Ayurveda Super speciality kidney care centre द्वारे किडनी failure CKD आजारावर उपचार करत असताना, आम्हाला CKD किंवा किडनी failure चे कारण शोधताना सर्वाधिक रुग्णांमध्ये सापडणारे कारण म्हणजे अधिक मात्रेत व चुकीच्या पद्धतीने खाल्लेल्या painkiller व तत्सम औषधी हे आहे.
🩺 Painkiller म्हणजे काय?
Painkillers म्हणजे वेदना कमी करणारी औषधे.
पण बऱ्याचदा वेदनेचे मुळ कारण न शोधता केवळ दुखणाऱ्या भागाला भूल देण्याचे काम या painkiller नी होते.
म्हणून त्या गोळीचा असत संपला की पुन्हा वेदना चालू होते.
NSAIDs (Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs)
जसे: Ibuprofen, Diclofenac, Nimesulide, Aspirin, Aceclofenac इ.
यामध्ये अनेक OTC (Medical शिवाय मिळणाऱ्या) औषधांचा समावेश असतो, त्यामुळे लोक विचार न करता वारंवार सेवन करतात.
बऱ्याचदा बोगस डॉक्टर , नर्स , कम्प्युंडर आदी अर्धवट लोकांनी दिलेल्या, bulk मध्ये मिळणाऱ्या स्टिरॉइड, painkiller यांचा समावेश असतो.
एकदा या गोळीने आराम मिळतो आहे असे रुग्णांना समजले की रुग्ण नियमितपणे या गोळ्यांची पाकिटे मेडिकल मधून खरेदी करून संपवत राहतो.
तसेच गावाकडे आजकाल निसर्ग उपचार, आयुर्वेद आदी नावाने काही उद्योगी लोक कुठला तरी ब्रँड काढून स्टॉल लाऊन बसतात. steroid painkiller टाकून बनवलेल्या वेगवेगळ्या पुड्या – पाउच – वेगवेगळे जडीबुटी ज्युस विक्रीस ठेवतात.
संधिवात मूळव्याध मुतखडाचे औषध म्हणून आकर्षक पॅकिंग मध्ये विक्रीस ठेवताना दिसतात.
गावाकडची जनता सहजते याला भुलते….पुडी खाल्ली की दोन तासात वेदना गायब….
मग contact no घेवून online पुड्या औषधे मागवणे चालू होते.
पाच सहा महिने पुड्या खाऊन अंग सुजायला लागले की मग धावपळ चालू होते.
मग तपासणी मध्ये कळते की, किडनी चे काम बिघडले आहे.
❗ Painkiller किडनी कशी खराब करते?
1️⃣ किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते
NSAIDs ही औषधे शरीरातील Prostaglandins नावाचे पदार्थ कमी करतात.
हे Prostaglandins किडनीपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह ठेवण्यास मदत करतात.
त्यामुळे Painkiller जास्त घेतल्यास:
किडनीकडे रक्तपुरवठा कमी होतो
फिल्टरिंग क्षमता कमी होते. दीर्घकाळात किडनीचे पेशी नष्ट होऊ लागतात.
2️⃣ किडनी हा रक्ताचा फिल्टर असल्याने शरीरात गेलेलं केमिकल (Painkiller)शरीराबाहेर टाकण्याचे काम किडणीकडे असते. ते बाहेर पडताना ही केमिकल युक्त रसायने किडनी च्या पेशींना (nephron) जखमा करतात. आणि जखमा झालेला भाग काम करणे बंद करतो. पुढे जाऊन किडनीचा आकार कमी होऊ लागतो.
त्यामुळे किडनीची कार्य क्षमता कमी होते.
Painkiller शिवाय इतर कुठलीही रसायने – केमिकल, किंवा इतर तीव्र द्रव्य (concentration ज्यादा असलेले पदार्थ – जसे की मद्य – अर्क इत्यादी ) शरीरात गेली तरी ती याच पद्धतीने काम करतात.
काही व्यक्ती Painkiller कमी मात्रेत घेतल्या तरी अचानक किडनी थांबण्यासारखी अवस्था निर्माण होऊ शकते,
विशेषतः:
– जन्मतः किंवा आधीपासून CKD असलेल्या
– डायबेटीस / BP असलेल्या
– डिहायड्रेशन असलेल्या
– वृद्ध व्यक्तींमध्ये
याशिवाय जर कोणी महिनोनमहिने किंवा वर्षानुवर्षे Painkiller घेत असेल तर …
– हळूहळू किडनीची गाळण्याची क्षमता कमी होते
– Creatinine वाढू लागते
– किडनी Shrink होऊ लागते
– नंतर Dialysis किंवा Kidney Transplant पर्यंत स्थिती जाऊ शकते.
⚠️ कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे?
Painkiller लांब काळ घेतल्यामुळे पुढील लक्षणे दिसू शकतात:
– भूक कमी होणे
– शरीर सुजणे
– लघवी कमी होणे
– थकवा
– उलट्या
– Blood Pressure वाढणे
ही चेतावणीची signs असून ताबडतोब तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी किडनी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांकडे उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकतो.
🛑 कोणाला Painkiller सर्वात धोकादायक?
CKD रुग्ण
डायबेटीस / हायपरटेन्शन
हृदयाच्या आजाराने त्रस्त
वय 55+ वर्ष
गर्भवती महिला
डिहायड्रेशन / खूप कमी पाणी पिणारे
✔️ Painkiller चे सुरक्षित पर्याय : Ayurveda दृष्टिकोनातून वेदनेचे मुळ कारण शोधून त्यावर उपाय करणे हे आहे.
वेदना सांध्याच्या झीजे मुळे आहे, सुजे मुळे आहे… की सांध्याच्या ठिकाणी दोष जमा झाल्याने आहे हे शोधून त्यावर उपचार करणे महत्वाचे असते.
त्यासाठी जवळच्या अभ्यासू आयुर्वेद वैद्याचा सल्ला घ्यावा.
स्थानिक तेल मसाज – एरंड तेल, माहानारायण तेल आदी
अग्निकर्म / विद्धकर्म / लेप / पट्टी – बिना दुष्परिणाम वेदना नियंत्रण
(टीप: औषध निवड वैद्यकीय सल्ल्यानेच करावी.)
📝 निष्कर्ष
Painkiller ही तात्पुरत्या आरामासाठी असली तरी किडनीवर तिचा परिणाम अत्यंत घातक असू शकतो. आज अनेक किडनी फेल्युअर रुग्णांमध्ये मुख्य कारण “Self-medication with Painkillers” हेच आढळते. वेळेत सावध राहून नैसर्गिक, सुरक्षित उपचारपद्धती स्वीकारणे हेच किडनी वाचवण्याचे उत्तम साधन आहे.
–
Healvibe Ayurveda Super Speciality Kidney Care Centre, Pimpri Pune
For Appointment Booking
(Online / Offline / Mumbai Visit):
📲 9226284424 | 7887882442
Visit Our Youtube channel for Watching Patient Feedback
▶️https://youtube.com/@ckdayuveda?si=CXPubToh9w9CbNJW
For more details:
🌐 www.ckdayurveda.com
